माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!