रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विश्राम, काहीसा आराम, काहीसा नवा दृष्टीकोन आपल्याला कथानक, गोष्टी यातून मिळतो .
गोष्टी,कथा, कहाण्या लहानपणी पासूनच आपल्या जवळच्या आहेत. मग त्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी असतील काय किंवा पू.लं.नी , व.पु. काळेंनी रचलेले कथानक असतील काय त्यातली पात्र ती कथा अजूनही आपलीशीच वाटते आणि एक सुखद अनुभव देऊन जाते.
अशाच अनेक कथानकाचा प्रवास घेऊन आलो आहोत.
सविनय सादर करीत आहोत.
गोष्टी तुमच्या आमच्या ....!
प्रवास गोष्टींचा, प्रवास आपलेपणाचा